Farmers entered the forest office to hang themselves

चिखली तालुक्यातील (Chikhali Taluka )अंचरवाडी व वसंतनगर येथील शेतकरी रोह्यांच्या (Rohi) त्रासाला प्रचंड वैतागले आहेत. शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक रोह्यांनी उध्वस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी २१ जुलै रोजी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देत पंचनामा करण्याची मागणी केली होती.

    बुलढाणा : रोह्यांच्या त्रासाला वैतागलेले अंचरवाडी, वसंत नगर येथील शेतकरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात (Offices of Forest Range Officers) गळफास घेण्यासाठी २४ जुलै रोजी घुसले. या प्रकारामुळे पोलीस विभागासह प्रशासकीय यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी शेतकऱ्यांची समजूत काढून तातडीने तोडगा काढण्यासाठी पावले उचलल्याने पुढील अनर्थ टळला.

    चिखली तालुक्यातील (Chikhali Taluka )अंचरवाडी व वसंतनगर येथील शेतकरी रोह्यांच्या (Rohi) त्रासाला प्रचंड वैतागले आहेत. शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक रोह्यांनी उध्वस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी २१ जुलै रोजी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देत पंचनामा करण्याची मागणी केली होती. मात्र, दोन दिवसांत पंचनामे न झाल्याने २० ते २५ शेतकऱ्यांनी २४ जुलै रोजी हातात दोऱ्या घेऊन गळफास घेण्यासाठी बुलढाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गाठले. वेळीच  बुलढाणा  शहर पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गाठले.

    वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे (Forest Range Officer Abhijit Thackeray) यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पावले उचलली. वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. जंगल परिसराला कंपाऊंड करण्यासाठी पाठपुरावा करणार असण्याचा शब्द दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.