हे कुटुंब 4 महिने पावसाचं पाणी साचवतं आणि 12 महिन्यांची तहान भागवितो

    हिंगोली (Hingoli) : आज पिण्याच्या पाण्याचा तुटवडा हा चिंतेचा विषय बनला आहे. तर अनेक ठिकाणी अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. यामुळे अनेक छोट्या – मोठ्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळें हिंगोलीमधल्या सेनगाव येथील संघई कुटुंबाने यावर हटके पर्याय शोधून काढला आहे. हे कुटुंब मागिल १० वर्षांपासुन पावसाचे पाणी साठवून ठेवताता आणि याचं पाण्याचा वापर वर्षभर पिण्यासाठी करतात.

    पाणी साठवून ठेवण्यासाठी घरामध्ये ७ हजार लिटरचा हौद बांधण्यात आला आहे., त्याचं बरोबर कॅन, जार, व घरातील इतर भांड्यात पाणी साठवून ठेवलं जात.संघई कुटुंबाला वर्षाकाठी एकूण पाच हजार लिटरपर्यंत पाणी लागत. घरातील लहान मुलांपासुन ते वृद्धांपर्यंत हे पाणी पितात. “जेव्हापासून हे पावसाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू लागलो तेव्हापासून आमचं आरोग्य अगदीं ठणठणीत आहे. त्याचं बरोबर पोटाचे आजार देखील कमी” झाल्याची माहिती या कुटुंबानं दिलीय.