“हे सरकार मनोज जरांगे-पाटलांना मारणार; फडणवीस सत्तेत आल्यापासून जाती-पातीचं राजकारण सुरु”, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्राला एक वेगळे संस्कृती आहे. मागील १० वर्षापासून महाराष्ट्र जाती-पातीत विभागला गेला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून दंगली, मोर्चे, आंदोलन, वाढली आहेत. अनेकांनी नेतृत्व केले, पण फडणवीस सत्तेत आल्यानंतर  राज्यातील वातावरण अशांत व अस्थिर झाले आहे, अशी घणाघाती टीका राऊतांन फडणवीसांवर केली.

  मुंबई – आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना, राज्य सरकारवर गंभीवर खळबळजनक आरोप केला. “मनोज जरांगे यांच मराठा आरक्षणासाठी मागील १६ दिवसांपासून जालन्यात उपोषण, आदोलन सुरु आहे, पण हे सरकार जरांगे-पाटलांना गुंडाळण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचे उपोषण तसेच मनोज जरांगे-पाटलांना हे सरकार मारणार, संपवणार आहे.” असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला. तसेच यावेळी त्यांनी हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, जनता यांना काढा दिल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर टीका केली. (this government will kill manoj jarange patil since fadnavis came to power caste caste politics has started sanjay raut sensational accusation)

  इंडियाची बैठक त्यामुळं रडीचा डाव

  दरम्यान, आज नवी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी इंडियाची बैठक होत आहे, यावर राऊतांना विचारले असता, आज इंडियाची बैठक होत आहे, यात जागा वाटपाची चर्चा होणार आहे. आज सकाळी अभिषेक बॅनर्जी यांना ईडीटी नोटीस आली आहे. हा रडीचा डाव, सुडाचे राजकारण सुरु आहे. या बैठकीसाठी बॅनर्जी पोहचू नये, यासाठी केंद्र सरकारने रडीचा डाव सुरु केला आहे. म्हणून त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे. असं राऊत म्हणाले. तसेच जागा वाटपाबाबत कोणताही अडथळा येणार नाही, असं राऊत म्हणाले.

  सत्तेसाठी नाही, हुकूमशाहीला उलथवून…

  पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सध्या विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर दबाव आहे, माझ्यावर दबाव आहे, पण काही झालं तरी ह्या दबावाला झुकायचं नाही. ह्यांना बळी पडायचे नाही. त्यामुळं देशााला एक संदेश जाईल, आजच्या बैठकीला बनर्जी उपस्थित राहू नये म्हणून ही ईडीची कारवाई आहे. आज, उद्या सध्या कोणावरही ईडीची कारवाई होईल, नोटीस येईल, असं राऊत म्हणाले. पण दबावाला आम्ही झुकणार नाही. तसेच आमची लढाई सत्तेसाठी नाही, हुकूमशाहीला उलथवून लावण्यासाठी एकत्र आलो आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

  फडणवीस सत्तेत आल्यापासून वातावरण अस्थिर

  विश्वासाच नातं सरकारचं राहिलं नाही. फडणवीस पहिल्या बैठकीत धनगरांना आरक्षण देऊ, आमची सत्ता आली की, २४ तासात मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणणारे हेच देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळं त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही. फडणवीस कुठे प्रचारासाठी जात असतील तर आम्हाला आनंद आहे. पण ह्या महाराष्ट्रातील वातावरण कधी नाही ते अस्थिर झालं आहे. याला भाजपा जबाबदार आहे. महाराष्ट्राला एक वेगळे संस्कृती आहे. मागील १० वर्षापासून महाराष्ट्र जाती-पातीत विभागला गेला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून दंगली, मोर्चे, आंदोलन, वाढली आहेत. अनेकांनी नेतृत्व केले, पण फडणवीस सत्तेत आल्यानंतर  राज्यातील वातावरण अशांत व अस्थिर झाले आहे, अशी घणाघाती टीका राऊतांन फडणवीसांवर केली.