‘हा तर मुंबई तोडण्याचा डाव, भाजपाच्या पोटातलं ओठावर आलं’, मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंचा घणाघात

शिवसेना सातत्यानं भाजपाला मुंबई तोडायची आहे, हे सांगतेय, त्यावर कर्नाटकच्या भाजपाच्याच मंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्याचंही त्यांनी म्हटलय. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदारांना किमान यांचा डाव तरी समजला असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

    नागपूर– कर्नाटकच्या मंत्र्यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करावा, ही मागणी म्हणजे भाजपाच्या पोटातलं ओठावर आल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. शिवसेना सातत्यानं भाजपाला मुंबई तोडायची आहे, हे सांगतेय, त्यावर कर्नाटकच्या भाजपाच्याच मंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्याचंही त्यांनी म्हटलय. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदारांना किमान यांचा डाव तरी समजला असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. मुंबईकरांना मुंबई कुणामुळे सुरक्षित आहे, हे चांगले ठाऊक असल्याचं उद्धव म्हणालेत. मुंबई केंद्रशासि करा, या कर्नाटकच्या मंत्र्यांच्या मागणीचा मुद्दा आता मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा होण्याची शक्यता आहे.

    कर्नाटकच्या मंत्र्यांच्या वादग्रस्त गणीचे पडसाद गेले दोन दिवस हिवाळी अधिवेशनात उमटत आहेत. मुंबई आमच्या बापाची आहे, तिला कुणीही धक्काही लावू शकत नाही असं उत्तर सत्ताधारी आणि विरोधकांनी कर्नाटकला दिलय. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधलाय. दरम्यान, घोटाळेबाज मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज ठाकरे गटाचेप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, शिंदे गटातील घोटाळेबाज मंत्री तसेच सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

    दोन आठवडे हिवाळी अधिवेशन सुरु आहे,  सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडलाय, महाराष्ट्राच्या जनतेला काय दिलं, याचं उत्तर दिलं पाहिजे. ५२ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांना मान्यता, याची अंमलबजावणी कशी होणार, याची अनिश्चितता आहे. रोज एक-एक मंत्र्यांच्या घोटाळ्यांबाबत आरोप झालेले आहेत. आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले नाहीत. गेल्या ६ महिन्यांत सरकार काय करतंय, हे लोकांसमोर आलंय का? घोटाळेबाज मंत्र्यांचे राजीनाम घेणार की, क्लिन चीट देणार, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.