अपघात की घातपात? आमदार अमोल मिटकरी यांच्या दाव्याने मोठी खळबळ, बच्चू कडू यांच्या अपघाताबद्दल संशय वाढला, मिटकरी म्हणाले…

आज त्या व्यक्तीला एखादा दुचाकीस्वार येऊन उडवतो अन् गंभीर दुखापत करतो. मला वाटतं काहीतरी काळंबेरं आहे, अशी शंका मिटकरी यांनी व्यक्त केलीये. तसेच घडलेल्या घटनेची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केलीये. त्यामुळं यावर शंका तसेच तर्क वितर्क काढले जात आहेत.

    अकोला : माजी मंत्री, आमदार व प्रहार संघटनेचे नेते बच्चू (bachu kadu) कडू यांचा काल अपघात (Accident) झाला. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला (Head) हाताला (hand) आणि पायाला गंभीर मार लागला आहे. आमदार बच्चू कडू हे काल पहाटे 6 ते 6.30च्या दरम्यान रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सुस्साट वेगात आलेल्या दुचाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे बच्चू जागेवरच कोसळले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी वेगळी शंका उपस्थित केली आहे.

    दरम्यान, जरी आमचे राजकीय मतभेद असतील, त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष वेगळा असेल, परंतु अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यातील दिव्यांगासाठी केलेलं काम मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. असा व्यक्ती सातत्याने सरकारमध्ये असतानाही सरकारच्या विरोधात बोलतो. आज त्या व्यक्तीला एखादा दुचाकीस्वार येऊन उडवतो अन् गंभीर दुखापत करतो. मला वाटतं काहीतरी काळंबेरं आहे, अशी शंका मिटकरी यांनी व्यक्त केलीये. तसेच घडलेल्या घटनेची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केलीये. त्यामुळं यावर शंका तसेच तर्क वितर्क काढले जात आहेत.

    काल सुसाट वेगान दुचाकीनं धडक दिल्यामुळं बच्चू कडू यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचं व सुधारत असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे. डोक्याला चार टाके मारण्यात आले. त्यांच्या डोक्याला आणि पायाला बँडेज लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून चिंतेचं काही कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सध्याच्या सरकारविरूद्ध बच्चू कडूंनी सातत्याने घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना? असा प्रश्न आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित केलाय.

    बच्चू कडू हे खुल्या मनाचे राजकारणी आहेत. मनात जे असेल ते बोलणारे नेते म्हणून बच्चूभाऊंची ओळख आहे. त्याचप्रकारे आता दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी झगडणाऱ्या नेत्याला एखादा दुचाकीस्वार येऊन उडवत असेल तर त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. या अपघातानंतर मलाही संशय येत आहे. भारतीय जनता पार्टीने एखाद्या व्यक्तीकडून काही करून घेतलं का? अशी शंका उपस्थित करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी अमोल मिटकरी यांनी केलीये.