‘हा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ, तुमच्या आईच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो’, शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, अजून काय लिहिलंय पत्रात?

पंतप्रधान मोदींच्या आईंला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेकांनी ट्विट करत, तब्येत लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. काल काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींच्या आईंची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी ट्वीट केल्यानंतर आज राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मोदींना पत्र लिहिले आहे.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांची काल प्रकृती अचानक बिघडल्याने, हिराबा यांना मंगळवारी रात्री अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिराबा यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या आईंला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेकांनी ट्विट करत, तब्येत लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. काल काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींच्या आईंची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी ट्वीट केल्यानंतर आज राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मोदींना पत्र लिहिले आहे.

    काय म्हटलंय पत्रात?

    दरम्यान, राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रात लिहिलंय की, “श्री नरेंद्र मोदी, मी वाचले की तुमच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आणि ती स्थिर आहे आणि बरी होत आहे हे जाणून मला बरे वाटले. मला माहित आहे की, तुम्ही तुमच्या लाडक्या आईच्या किती जवळ आहात आणि तुमचे तिच्याशी किती विशेष ऋणानुबंध आहेत. मी तिला लवकर बरे व्हावे आणि चांगले आरोग्य मिळावे अशी इच्छा व्यक्त करतो”, असं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

    गुजरात निवडणुकीपूर्वी 18 जून रोजी मोदींनी त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आईची भेट घेतली होती. तसेच गुजरात निवडणुकीच्या मतदानादरम्यान 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मातोश्री हिराबेन यांची गांधीनगरमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत बसून चहा प्यायला. तसेच गप्पागोष्टी तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. दरम्यान, त्याआधी यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्च रोजी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना आपल्या आईला भेटले होते.