आमच्याविरोधात ही सूडाची कारवाई, भविष्यात जनता याच उत्तर देईल; नावेद मुश्रीफ यांची सत्ताधाऱ्यांवर टिका, म्हणाले…

तब्बल 12 तास चाललेल्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घराबाहेर पडले. यानंतर नावेद मुश्रीफ (Naved Mushrif) म्हणाले की, आमच्याविरोधात ही सूडाची कारवाई, भविष्यात जनता याच उत्तर देईल; असं नावेद मुश्रीफ म्हणाले आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना असून, काल कागल बंदची हाक देण्यात आली होती.

    कोल्हापूर- बुधवारी राज्याच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी घडामोड घडली. माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर ईडी (ED) आणि आयकर विभागाने (Income Tax) धाडी टाकली. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल (kolhapur, kagal) येथील घरांवर पहाटे 6.30 वाजल्यापासून छापेमारी केली. या छापेमारीत जवळपास 20 अधिकारी सहभागी होते. तब्बल 12 तास चाललेल्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घराबाहेर पडले. दरम्यान, या छापेमारीनंतर आमदार नावेद मुश्रीफ यांची प्रतिक्रिया समोर आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडी व आयकर विभागातील धाडीनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

    काय म्हणाले नावेद मुश्रीफ…

    दरम्यान, तब्बल 12 तास चाललेल्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घराबाहेर पडले. यानंतर नावेद मुश्रीफ (Naved Mushrif) म्हणाले की, आमच्याविरोधात ही सूडाची कारवाई, भविष्यात जनता याच उत्तर देईल; असं नावेद मुश्रीफ म्हणाले आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना असून, काल कागल बंदची हाक देण्यात आली होती. काल मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती. पोलीस व कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. कारण मुश्रीफांना देव मानणारा त्यांचा मतदार आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी गर्दी झाली होती. कारण मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील त्यांना मानणारा एक मोठा गट तसेच त्यांचा चाहता वर्ग आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी पडल्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, कार्यकर्त आक्रमक झाले आहेत. तसेच ह कार्यकर्ते आयकर विभाग व ईडीच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा दिली.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हा आमदार हसन मुश्रीफ यांचा मतदारसंघ आहे. कोल्हापुरातील आप्पासाहेब नलावडे, गडहिग्लज साखर कारखान्यात १२७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच हा कारखाना आमदार हसन मुश्रीफ यांचे जावई अनधिकृतपणे चालवत होते. या कारखान्यात आमदार हसन मुश्रीफ यांचे जावई व स्वत: मुश्रीफ यांनी मिळून १२७ कोटींचा घोटाळा तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच याआधी देखील याची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमय्यांनी केली होती. त्यानंतर आज आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज या ठिकाणी सध्या ईडी छापेमारी करत आहे.