संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आज राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. (Maharashtra SSC Result 2022) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल (SSC Result) 96.94 टक्के लागला आहे. यात कोकण विभाग (Kokan division) अव्वल आला असून, नाशिक (Nashik division) विभाग सर्वात मागे राहिला आहे. कोकण विभागाचा यंदाचा निकाल 99.27 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले.

    मुंबई : अनेक दिवसांपासून विद्यार्थी व पालक (Students and parents) ज्या दिवसांची वाट पाहत होते, तो दिवस आज उजाडला. आज राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. (Maharashtra SSC Result 2022) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल (SSC Result) 96.94 टक्के लागला आहे. यात कोकण विभाग (Kokan division) अव्वल आला असून, नाशिक (Nashik division) विभाग सर्वात मागे राहिला आहे. कोकण विभागाचा यंदाचा निकाल 99.27 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण 96.06 टक्के इतके आहे. अर्थात परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळं यावर्षी सुद्धा पोरांपेक्षा पोरीच हुश्शार असं म्हणावे लागेल.

    दरम्यान, या वर्षी परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,84,790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,68,977 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 96.94 आहे. तसेच मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुलींनीच बाजी मारली आहे.

    दहावीचा विभागवार निकाल

    १) पुणे 96.96

    २) नागपूर 97.00

    ३) औरंगाबाद 96.33

    ४) मुंबई 96.94

    ५) कोल्हापूर 98.50

    ६) अमरावती 96.81

    ७) नाशिक 95.90

    ९) लातूर 97.27

    १०) कोकण 99.27

    ऑनलाईन निकाल कसा पाहाल

    दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.