सकल मराठा समाजाचा ठिय्या आंदोलन ; मराठ्यांना ओबिसी मधुनच आरक्षण द्या

मराठा समाजाला ओबिसी मधुनच आरक्षण देण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन मनोज जंरगेना पाठिंबा दर्शवत माढ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाज बांधवानी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ठिय्या आंदोलनास शनिवारी सकाळी ११ वाजता सुरुवात करण्यात आली. जालना जिल्हातील अंतराली येथे मनोज जरांगे यांचे राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरु आहे.

    माढा : मराठा समाजाला ओबिसी मधुनच आरक्षण देण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन मनोज जंरगेना पाठिंबा दर्शवत माढ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाज बांधवानी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ठिय्या आंदोलनास शनिवारी सकाळी ११ वाजता सुरुवात करण्यात आली. जालना जिल्हातील अंतराली येथे मनोज जरांगे यांचे राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरु आहे.

    मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवत हे उपोषण सुरु करण्यात आले असुन जो पर्यत मनोज जरांगे उपोषण सोडणार नाहीत.तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार माढ्यातील सकल मराठा समाजाने व्यक्त केला. यावेळी एक मराठा लाख मराठा…आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…यासह अन्य घोषणा बाजी करण्यात आली.यावेळी विविध संघटनांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा दर्शवण्यात आला.तहसीलदार विनोद रणवरे यांनी आंदोलन स्थळी येऊन शंंभु साठे यांचेेसह  आंदोलकाची भूमिका जाणुन घेतली. आंदोलनात सकल मराठा समाज बांधवासह बहुजन समाजातील नागरीक सहभागी झाले होते.

    मुस्लिम समाजाचा पाठिंबा-मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे याकरिता माढा येथील मुस्लिम बांधवांनी माढ्यातील आंदोलनासह मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.याप्रसंगी जहीर मनेर, हाजी सिकंदर शेख, हाजी हारून मुलाणी, आयुब खान शेख, अजिज शेख, सादिक फकीर, फारुख फकीर, जमीर शेख, सोयल मुलानी, फकीर रहमान पठाण, जावेद पठाण, अब्बास पठाण, अब्दुल शेख यांच्यासह मुस्लिम बांधव होते.