‘वसुली न करणाऱ्यांना घरी बसविणार’; प्रशासक जी. श्रीकांत यांचा कर्मचाऱ्यांना इशारा

'मी तिकीट कलेक्टर म्हणून जीएसटीमध्ये काम केले आहे, महापालिकेची तिजोरी (Municipal Revenue) कशी भरायची हे मला माहीत आहे' असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी वसुलीकडे विशेष लक्ष देण्यास सुरवात केली.

    छत्रपती संभाजीनगर : ‘मी तिकीट कलेक्टर म्हणून जीएसटीमध्ये काम केले आहे, महापालिकेची तिजोरी (Municipal Revenue) कशी भरायची हे मला माहीत आहे’ असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी वसुलीकडे विशेष लक्ष देण्यास सुरवात केली असून, ज्यांच्याकडून वसुली होणार नाही, त्यांना थेट घरी बसविले जाईल, असा इशारा त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता.

    गेल्या आठवड्यात प्रभागनिहाय वसुली कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांना “वसुली वाढवा, अन्यथा तर थेट घरी जावे लागेल,” असा इशारा दिला. प्रशासकांच्या इशाऱ्यामुळे कर्मचारी कामाला लागले आहेत. त्यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी कामाला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेची दररोजची मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली ३० ते ४० लाख रुपये होत होती. सध्या हा आकडा ८० ते ९० लाखांवरपर्यंत जात आहे.

    महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी यासंदर्भात सांगितले की, आढावा बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि दररोजच्या वसुलीवर माझे लक्ष राहील, अशा सूचना केल्या.