the kharghar incident should be investigated by a retired judge file a case of culpable homicide against the government immediately ajit pawars demand in a letter to the governor nrvb

१९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेत असताना ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा चालतील असे सांगण्यात आले. खरंतर दोन हजार रुपयांच्या नोटा मोठे आर्थिक व्यवहार करणारे लोकांकडे असतात सर्वसामान्य गरीब लोकांकडे नाहीत.

    मुंबई – खरंतर दोन हजार रुपयांच्या नोटा (note) या मोठे आर्थिक व्यवहार करणार्‍या लोकांकडे असतात. सर्वसामान्य गरीब लोकांकडे या नोटा नव्हत्या. गेली दोन वर्षे तर बँकेतदेखील (Bank) या नोटा मिळत नव्हत्या. मग दोन हजाराच्या नोटा छापून काळा पैसा बाहेर काढायचा होता तर ज्यांनी काळा पैसा साठवला आहे. तो बाहेर पडण्याकरता सप्टेंबरपर्यंत मुदत द्यायचे कारण नव्हते असे थेट हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारवर पत्रकार परिषदेत केला.

    नोटबंदी करायचं कारण काय?

    आज सकाळी एक बातमी वाचली साडेचार हजार कोटी रुपये हवालामार्फत बाहेर गेले. असे आकडे ऐकले तर नोटबंदी करायचं कारण काय असा सवालही अजित पवार यांनी केला आहे. १९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेत असताना ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा चालतील असे सांगण्यात आले. खरंतर दोन हजार रुपयांच्या नोटा मोठे आर्थिक व्यवहार करणारे लोकांकडे असतात सर्वसामान्य गरीब लोकांकडे नाहीत. पाचशे आणि हजार रुपयांची नोट पंतप्रधानांनी ज्यादिवशी बंद करण्याचे जाहीर केले. त्याच्या दुसर्‍या दिवशीच त्या नोटा कागदाचा तुकडा झाला. त्याचपध्दतीने करता आले असते आणि त्यातून काळा पैसा हा चलनामध्ये फिरतोय तो फिरण्यापासून वाचवता आला असता. नोटबंदीच्यावेळी रांगेत उभे राहून मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र शंका म्हणून दोन हजारची नोट त्याचदिवशी बंद करायला हवी होती. चार महिने देणे म्हणजे कमी दिवस नाहीत, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडले.

    …आता सत्य समोर येईल

    आमचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकार्‍याच्या करारनाम्यावर स्पष्टपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी नवाब मलिक यांना खोटं ठरवण्याचा किंवा ते जाणीवपूर्वक करत असल्याचे दाखवण्यात आले मात्र त्याच आरोपांची चौकशी आज सीबीआय करतेय ते अधिकारी फार स्वच्छ आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आता मात्र लोकांसमोर सीबीआयनेच सत्य समोर आणले आहे असेही अजित पवार म्हणाले. एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. पुरावे माध्यमातून शेअर न करण्याचा आदेश दिला आहे. आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून काही रक्कम मागितल्याचा आरोप संबंधित अधिकार्‍यावर आहे. याबाबतचा उल्लेख सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. सीबीआय आता त्याचा तपास करत आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

    अरविंद केजरीवाल मुंबईत…

    दरम्यान, आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन पवारसाहेबांची आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मी सुद्धा उपस्थित राहणार आहे अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.