शिवसैनिकांना शिंग राहिले आहेत काय? स्वतःच्या पदासाठी हिंदुत्व सोडणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये, नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात

    मुंबईः राज्यात मागील काही दिवसांपासून अजान, भोंगे, मशिद, हनुमान चालीस, आरती यावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. हनुमान चालीसा व भोंग्यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला व खासकरुन मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, आपण 14 तारखेच्या सभेत अनेकांचे मास्क काढणार आहोत, असं म्हणत त्यांनी विरोधकांना एका प्रकारे इशारा दिला होता. त्यामुळं मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या “खऱ्या हिंदुत्वासाठी यायलाच पाहिजे” असे मुंबईत अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच सभेचे तीन व्हीडिओ टिझर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सभेपूर्वी शिवसनेनं चांगलेच वातावरणनिर्मिती केली आहे. मात्र शिवसेनेच्या आजच्या सभेवर विरोधकांकडून टिका होत आहे.

    दरम्यान, भाजपा खासदार नारायण राणेंनी सुद्धा शिवसेनेच्या आजच्या सभेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंनी एक टिव्ट केले आहे. “शिवसेना पक्षप्रमुखांची गर्जना, “शिवसेनेच्या अंगावर आले, तर शिंगावर घ्या..” अहो.. शिवसैनिकांना शिंग राहिले आहेत काय?? पक्षप्रमुखांनी ती टिकवलीत का? शिवसैनिकांना मदत केली आहे का? स्वतःच्या पदासाठी हिंदुत्व सोडणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये.” असं या टिव्टमध्ये मजकूर लिहिला असून खरे हिंदुत्व आहे का? असा सवाल राणेंनी उपस्थित करत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

    शिवसेना पक्षप्रमुखांची गर्जना आहे की, “शिवसेनेच्या अंगावर आले, तर शिंगावर घ्या..” अहो..पण शिवसैनिकांना शिंग राहिले आहेत काय?? असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच पक्षप्रमुखांनी ती टिकवलीत का? शिवसैनिकांना मदत केली आहे का? स्वतःच्या पदासाठी हिंदुत्व सोडणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये. असं सुद्धा खडे बोल राणेंनी शिवसेना व मुख्यमंत्र्यांना सुनावले आहेत. त्यामुळं आता नारायण राणेंच्या या टिकेला शिवसेना कसं उत्तर देते हे पाहावे लागेल.