LIVE : यशवंत चव्हाण सभागृह येथून शरद पवार मातोश्री निवासस्थानाकडे रवाना

ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना दिले. उद्धव यांनी शिवसेना भवनातील जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ऑनलाइन मार्गदर्शन केले. जे सोडून गेले त्यांचे वाईट का वाटावं. मी जिद्द सोडली नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

    मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर हल्लाबोल, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले, काहींना मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवल्याचा आरोप, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत जिद्दीने पुन्हा पक्ष उभा करण्याचं आवाहन केलं आहे.

    ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना दिले. उद्धव यांनी शिवसेना भवनातील जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ऑनलाइन मार्गदर्शन केले. जे सोडून गेले त्यांचे वाईट का वाटावं. मी जिद्द सोडली नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

    शिवसेनाभवनात एक बैठक झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. आदित्य म्हणाले, कुटुंबप्रमुखाला धोका देता याचे वाईट वाटते. धोका मित्रपक्षांनी दिला असता, तर समजू शकलो असतो. राज्यातील सर्व जनता उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.