लोकसभेसाठी 14 जागा देईल तो आपला; प्रकाश आंबेडकर यांची भूमिका

आपला राजकीय मित्र पक्ष ओळखायचा असेल, तर राखीव जागा सोडून उद्याच्या लोकसभेत ओबीसींना कोण जास्त उमेदवारी देत आहे ते महत्वाचे आहे. जो पक्ष लोकसभा निवडणुकीत ओबीसींना किमान १४ ठिकाणी उमेदवारी देईल तो आपला पक्ष असेल.

  माढा : आपला राजकीय मित्र पक्ष ओळखायचा असेल, तर राखीव जागा सोडून उद्याच्या लोकसभेत ओबीसींना कोण जास्त उमेदवारी देत आहे ते महत्वाचे आहे. जो पक्ष लोकसभा निवडणुकीत ओबीसींना किमान १४ ठिकाणी उमेदवारी देईल तो आपला पक्ष असेल, असा मंत्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांनी माढा येथे झालेल्या ओबीसी परिषदेत दिला.

  एक-दोन मंत्री राहून दोन-चार खासदार निवडून फरक पडत नाही. त्यांचा आवाज कोणी ऐकत नाही. जोपर्यंत आपण मोठ्या संख्येने जात नाही तोपर्यंत निर्णय प्रक्रियेवरती आपला ताबा राहत नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

  एकनाथ शिंदेंनी करायचे होते ते केले

  मराठा आरक्षण निर्णयावर भाष्य करताना अॅड. आंबेडकारांनी म्हटले की, भाजप म्हणत होते की, आम्ही ओबीसींच्या बाजूने आहोत. आम्ही त्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे ते म्हणत होते. पण, काल ते काहीच करू शकले नाहीत. एकनाथ शिंदे यांना जे करायचे होते, ते त्यांनी केले. देवेंद्र फडणवीस मात्र गप्प बसले.

  भाजपवर विश्वास ठेवता येत नाही

  भाजप हा बेभरवशाचा पक्ष आहे. भाजपवर आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. म्हणून, ज्या पक्षावर विश्वास ठेवता येत नाही. त्या पक्षाला आपण मतदान करायचे नाही. ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे, उ असे आवाहनही त्यांनी केले.