Thousands of quintals of goods burnt by Prabhudev Trading Company's godown

या गोडाऊन  मधून मंगळवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे नागरिकांना दिसले. त्यामुळे नागरिकांनी याबाबत तात्काळ  गोडाऊन मालक रामराव माणिकराव धाडवे ( रा मोहदी ), सूबोध सूर्यकांत प्रतापवार आणी शाम गंगाळे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले असता संपूर्ण गोडाऊन आगीत भस्मसात झाले होते.

    हिवरा : महागाव तालुक्यातील गुंज येथील प्रभुदेव ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये शेतकऱ्यासह व्यापाऱ्यांचा संपूर्ण माल जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. गुंज येथे प्रभुदेव ट्रेडींग कंपनीचे भुसार माल साठविण्याचे मोठे गोडाऊन आहे.

    या गोडाऊन  मधून मंगळवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे नागरीकांना दिसले. त्यामुळे नागरिकांनी याबाबत तात्काळ  गोडाऊन मालक रामराव माणिकराव धाडवे ( रा मोहदी ), सूबोध सूर्यकांत प्रतापवार आणी शाम गंगाळे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी  तात्काळ  घटनास्थळ गाठले असता संपूर्ण गोडाऊन आगीत भस्मसात झाले होते. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु, आग इतकी मोठी होती की आगीने रौद्ररूप धारण केले होते. पुसद व उमरखेड येथील अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली.

    मात्र, या गोडाऊनमध्ये १ हजार ५०० क्विटल हळद, १०० क्विटल चणा, ८० क्विटल तुर, ४० क्विटल गहु, हळद ग्रेडींग करण्याची मशिन या वस्तु मोठ्या प्रमाणात असल्याने आग काही वेळातच वाढली. त्यामुळे जवानांनी आगीवर पाण्याचा जोरदार मारा करुन त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. २४ तासानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविता आले. रात्रदिवस जवानांकडून कुलींगचे काम सुरु होते. या आगीमध्ये संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. या आगीत मोठे नुकसान झाल्याचे गोडाऊनचे मालक शाम गंगाळे यांनी माहिती दिली. दरम्यान, गोडाऊनला आग कशामुळे लागली, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

    महागाव येथे स्वतंत्र अग्निशमन दल निर्माण करा

    महागाव तालुक्याचे क्षेत्रफळ सर्वदूर व विस्तीर्ण पसरलेले आहे. तालुक्यात यापुर्वी सुद्धा अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यात एकही अग्निशमन दलाची गाडी नसल्याने आग विझविण्यासाठी पुसद, उमरखेड तसेच लगतच्या मराठवाड्यातील माहुर येथील अग्निशमन दलाच्या गाड्याच्या भरवशावर अवलंबून रहावे लागते. या दरम्यान भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन  महागाव तालुक्याला अग्निशमन दलाची गाडी व पथकाची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक करीत आहेत