आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका? औरंगजेब वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ, आता वाय प्लस सुरक्षा

औरंगजेब वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, आता त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे. औरंगजेब वादग्रस्त वक्तव्यानंतर आव्हाडांचा जीवाला धोका असल्यांच बोललं जात आहे, त्यामुळं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

    मुंबई- छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. स्वराज्य रक्षक ही उपाधी त्यांच्या नावापुढे लावण्यात आली आणि तिच योग्य आहे असं वक्तव्य अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यावरून उमटणारे पडसाद थांबताना दिसत नाहीत. तोच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबच्या वक्तव्यानंतर नवा वादाला तोंड फुटले आहे, हा त्यामुळं आगामी काही दिवस यावरुन वातावरण तापणार असून, आव्हाडांच्या विरोधात मोर्चे, आंदोलन होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, यानंतर एक नवी घडामोड घडली आहे, औरंगजेब वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, आता त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे. औरंगजेब वादग्रस्त वक्तव्यानंतर आव्हाडांचा जीवाला धोका असल्यांच बोललं जात आहे, त्यामुळं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, याचे गृहविभागाचे आदेश दिले आहेत. यामुळं आव्हाडांच्या सुरक्षेत पहिल्यापेक्षा अधिक वाढ होणार आहेय

    काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

    “छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्य रक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कुणी? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. असं आव्हाड म्हणाले आणि नवीन वादाला सुरुवात झाली आहे. पुढे आव्हाड म्हणाले की, तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की, उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो, असं आव्हाडांनी म्हटलेय.”