Threatened to beat married woman to death for dowry

२८ वर्षीय विवाहित महिलेने तक्रार (Complaint by a married woman ) दिली की, नवरा व सासरच्या मंडळींनी संगनमत करून माहेरवरून गाडी घेण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन ये, असा सतत तगादा लावला.  या कारणावरून वाद करून शिवीगाळ केली. तसेच, मारहाण करून जीवाने मारण्याची धमकी दिली. व मुलासह घराबाहेर काढून दिले.

    शिरपूर जैन : विवाहित महिलेला मारहाण (Beating a married woman) करून जीवे मारण्याची धमकी (Death threats) दिल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी (Shirpur Police) पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिरपूर पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील (Risod Taluka) आसेगाव पेन ( ह.मु. तिवळी ) येथील जयेती रामेश्वर खानझोडे या २८ वर्षीय विवाहित महिलेने तक्रार (Complaint by a married woman ) दिली की, नवरा व सासरच्या मंडळींनी संगनमत करून माहेरवरून गाडी घेण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन ये, असा सतत तगादा लावला.  या कारणावरून वाद करून शिवीगाळ केली.

    तसेच, मारहाण करून जीवाने मारण्याची धमकी दिली. व मुलासह घराबाहेर काढून दिले. अशा तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी आरोपी रामेश्वर पंढरी खानझोडे, सिंधूबाई पंढरी खानझोडे, पंढरी यशवंता खानझोडे, ज्ञानेश्वर पंढरी खानझोडे व सविता ज्ञानेश्वर खानझोडे सर्व ( रा. आसेगाव पेन ता. रिसोड) या पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सफौ दामोदर इप्पर हे करीत आहेत.