वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचे पत्र; वसंत मोरे फेसबुक पोस्ट करून म्हणतात…

वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पत्रामध्ये सावध राहा रुपेश असा मजकूर लिहिण्यात आला आहे. ही चिठ्ठी रुपेश मोरे यांच्या कारवर ठेवण्यात आली होती.

    पुणे : काही दिवसांपासून मनसेचे पुण्यातील नेतसंत मोरे काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. विविध उपक्रम आणि आंदोलनांमुळे वसंत मोरे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात.

    मात्र, आता ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पत्रामध्ये सावध राहा रुपेश असा मजकूर लिहिण्यात आला आहे. ही चिठ्ठी रुपेश मोरे यांच्या कारवर ठेवण्यात आली होती.

    या प्रकरणी वसंत मोरे यांचे सुपूत्र रूपेश मोरे यांनी भारत विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    वसंत मोरे नेमकं काय म्हणाले? 

    स्वःतः वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली. ‘ “मुलगा म्हटलं की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटलं की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो… आमचंही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे य का खटकतंय तेच समजत नाही.

    राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही…गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हतं, पण आज ठरवलं तुमच्या सोबत बोललच पाहिजे… साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली, त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफरमध्ये “सावध रहा रुपेश” अशी चिठ्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली… तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असं का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय. या प्रकरणामुळे वसंत मुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत