Threatening to kill a woman by beating her, charges filed against three persons

शिरसाळा शेतशिवारात नंदा वाघ ही महिला काडीकचरा वेचत होती. दरम्यान आरोपींनी या महिलेस म्हटले की हे शेत आमचे आहे तू आमच्या शेतात काडीकचा का वेचत आहे. या कारणावरून महिलेशी वाद घातला व तिच्या डोक्यात गोटा मारून जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन, शिविगाळ केली. तसेच जिवाने मारण्याची धमकी दिली.

    शिरपूर : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिरसाळा शेतशिवारात २३ जून रोजी दुपारी ३५ वर्षीय महिलेला बेदम मारहाण करून जखमी केले व जीवाने मारण्याची धमकी दिली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिरपूर पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

    या घटनेबाबत शिरपूर पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, शिरसाळा शेतशिवारात नंदा वाघ ही महिला काडीकचरा वेचत होती. दरम्यान आरोपींनी या महिलेस म्हटले की हे शेत आमचे आहे तू आमच्या शेतात काडीकचा का वेचत आहे. या कारणावरून महिलेशी वाद घातला व तिच्या डोक्यात गोठा मारून जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन, शिविगाळ केली. तसेच जिवाने मारण्याची धमकी दिली.

    नंदा संजय वाघ (वय ३५) रा. जांब आढाव, ह. मु. शिरसाळा या महिलेनी २३ जून रोजी रात्रीला या प्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादीवरुन शिरपूर पोलिसांनी सुभाष रामचंद्र इंगोले (वय ५०), सुधाकर सुभाष इंगोले (वय ३०) व रामप्रसाद सुभाष इंगोले (वय ३२ वर्षे सर्व रा. शिरसाळा) यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनात नापोको भिमराव गवई हे करीत आहेत.