किडनी विकण्याची धमकी देत विवाहितेकडे पाच लाखांची मागणी; भडगाव तालुक्यातील घटना

भडगाव तालुक्यातील भोरटेक (Bhortek) येथील माहेरी आलेल्या विवाहितेला पाच लाखांची मागणी करण्यात आली. तसेच किडनी विकून देण्याची धमकी देत छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भडगांव : भडगाव तालुक्यातील भोरटेक (Bhortek) येथील माहेरी आलेल्या विवाहितेला पाच लाखांची मागणी करण्यात आली. तसेच किडनी विकून देण्याची धमकी देत छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भडगाव तालुक्यातील भोरटेक येथील माहेर असलेल्या वृषाली जितेंद्र पाटील (वय २५) यांचा विवाह अमळनेर येथील जितेंद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला पाच लाखांची मागणी करण्यात आली.

    दरम्यान, पैशांची पूर्तता न झाल्याने तिला मारहाण करून छळ करण्यात आला. यानंतर संतप्त झालेल्या महिलेने अखेर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आहे.