
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वेगळ्या विदर्भाबाबत अनोख्या आंदोलनामुळे प्रसिद्ध झालेल्या बाबाराव मस्की यांनी हि धमकी दिली असून फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्यदेखील केले आहे.
चंद्रपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वेगळ्या विदर्भाबाबत अनोख्या आंदोलनामुळे प्रसिद्ध झालेल्या बाबाराव मस्की यांनी हि धमकी दिली असून फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्यदेखील केले आहे. दरम्यान, भाजपच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी मस्की यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे बाबाराव मस्की?
राजुरा तालुक्यातील बाबाराव मस्की हे कट्टर विदर्भवादी म्हणून ओळखले जातात. तसेच ते अनोखे आंदोलनामुळे प्रसिध्द आहे. मस्की यांनी नुकतेच सोशल मिडीयावर फडणवीस व मुनगंटीवार यांच्यावर टीका करीत ठार मारण्याची धमकी दिली आहे. या आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बाबाराव मस्की यांच्याविरोधात राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, संजय जयपूरकर, संदीप पारखी बाबुराव जिवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात बाबाराव मस्की यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास राजुरा पोलीस करीत आहे.