गौणखनिज प्रकरणातील तीन आरोपी अटकेत; बोदवड पथकाची कारवाई

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू, मुरूम (गौण खनिज) चोरीचे प्रकार होत असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी कार्यवाहीचे आदेश दिले होते. बोदवड तहसील कार्यालयाच्या  (Bodwad Crime) पथकाने मुरूम चोरी करून घेऊन जात असताना आरोपी दिपक तुळशिराम सपकाळ व जंगलु मांगो मोरे यांचे ताब्यात घेतले.

    बोदवड : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू, मुरूम (गौण खनिज) चोरीचे प्रकार होत असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी कार्यवाहीचे आदेश दिले होते. बोदवड तहसील कार्यालयाच्या  (Bodwad Crime) पथकाने मुरूम चोरी करून घेऊन जात असताना आरोपी दिपक तुळशिराम सपकाळ व जंगलु मांगो मोरे यांचे ताब्यात घेतले. तसेच एक विना नंबरचा ट्रॅक्टरमध्ये मुरुम भरलेला असताना पकडले होते.

    यावेळी संशयित आरोपी दिपक तुळशिराम सपकाळ व जंगल मांगो मोरे व साथीदारांनी त्यांना अडवून मारहाण करत पकडलेले एक ट्रॅक्टर हे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या ताब्यातून जबरीने हिसकावून घेऊन पळून गेले होते. तसेच एक विना नंबरचे मुरूमाने भरलेले ट्रॅक्टर बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. त्याबाबत बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

    याबाबत बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद तायडे, पोलिस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन, आधारे दिपक सपकाळ, जंगल मांगो मोरे (४०) बोदवड, अनिल एकनाथ शेळके (वय ४५ रा. जामठी दरवाजा, बोदवड), सुधाकर ओंकार राठोड (वय २१, रा. पळासखेडा ता. बोदवड) यांना कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवडच्या मागे लपलेले असताना त्यांना शिताफीने पकडून गुरुवार (दि.१४) रोजी अटक करण्यात आलेली आहे.