दरोड्यातील तीन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर इथे शुक्रवारी रात्री पडलेल्या दरोड्याचा तपास लावून दरोड्यातील तीन सराईत आरोपींना जेरबंद करण्यात जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. घटनेनंतर २४ तासाच्या आत गुन्हे शाखेने आरोपी जेरबंद केले आहेत.

    कोपरगाव : कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील संवत्सर इथे शुक्रवारी रात्री पडलेल्या दरोड्याचा तपास लावून दरोड्यातील तीन सराईत आरोपींना जेरबंद करण्यात जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. घटनेनंतर २४ तासाच्या आत गुन्हे शाखेने आरोपी जेरबंद केले आहेत.

    कोपरगाव तालुक्यातील संवत्सर इथे शुक्रवारी रात्री सोनवणे यांचा घराच्या दरवाजाची चौकट तोडून सात दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दरोडा टाकत घरातील पुरुष-महिलांना गज, चाकू, दांडक्याने बेदम मारहाण करत २ लाख ८१ हजारांचे दागिने आणि रोख रक्कम लुटली होती. या दरोड्याबाबत फिर्यादी कविता अनिल सोनवणे (वय ५० रा. नऊचारी, संवत्सर, ता. कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरोडेखोरांच्या मारहाणीत अनिल हरीभाऊ सोनवणे (वय ५४), सुगंधाबाई हरीभाऊ सोवणे (वय ७८ वर्षे), सुनिता बबन सोनवणे (वय ५२ वर्षे सर्व रा. नऊचारी, संवत्सर, ता. कोपरगाव) यांना गजाने, चाकूने, लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी करुन घरातील २,८१,५००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने दरोडेखोरांनी लुटले होते.

    याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये भा द वि क. ३९५,३९७ प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समांतर तपासाचे आदेश देण्यात आले होते. तपासादरम्यान गुन्हे शाखेचे निरीक्षक कटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा दरोडा सराईत गुन्हेगार दिलीप विकास भोसले (रा. कारवाडी शिवार, कोकमठाण, ता. कोपरगाव) याने त्याचे साथीदारांसह केला असल्याची माहिती मिळाली.

    मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी असलेल्या ठिकाणी छापा टाकून १) दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले (रा. काटवाडी, कोकमठाण, ता. कोपरगाव) (२) अनिल अरुण बोबडे (रा. बेस, ता. राहाता) (३) राहुल दामू भोसले (रा. जेकर पाटोदा, ता. कोपरगाव) यांना ताब्यात घेतले. कारवाई वेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. जेरबंद केलेल्या आरोपींवर नगरसह ठाणे,पुणे जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.

    आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी कोपरगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, स पो नि गणेश इंगळे, स पो नि दिनकर मुंडे, पो स ई सोपान गोरे, बाळासाहेब मुळीक, मनोहर शेजवळ, सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, योगेश घोडके, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, राहुल सोळुंके, संदीप चव्हाण, दिलीप शिंदे, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, रणजित जाधव, रविंद्र घुंगासे, विजय धनेधर, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर, बबन बेरड, अर्जुन बडे, चापोकों भरत बुधवंत यांनी कामगिरी बजावली.