
या धाडीदरम्यान जी झडती घेण्यात आली त्यात घरात ४२ हजार रुपये किमतीचा साडेतीन किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करून शेख सलमानला अटक केली. या प्रकरणी शेख सलमानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अमरावती : यास्मीननगर येथील एका घरी धाड टाकून नागपुरी गेट पोलिसांनी साडेतीन किलो गांजा जप्त केला. शेख सलमान शेख अतीक (२५, रा. यास्मीननगर) असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. शेख सलमानने विक्रीसाठी आपल्या घरात गांजा साठवून ठेवल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आज पहाटे शेख सलमानच्या घरी धाड टाकली.
या धाडीदरम्यान जी झडती घेण्यात आली त्यात घरात ४२ हजार रुपये किमतीचा साडेतीन किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करून शेख सलमानला अटक केली. या प्रकरणी शेख सलमानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हिवाळे, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम ठाकरे, अशोक वाटाणे, बबलू येवतीकर, प्रमोद गुळधे, विक्रम देशमुख, संजय भारसाकळे, मंगेश लोखंडे, धीरज यादव, वैशाली बनारसे आदींनी केली.