पाचशे रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या झेडपीच्या शाखा अभियंत्यांसह तिघांना अटक

पाचशे रुपयांच्या लाचेसाठी (Bribe Case) सोलापूर झेडपी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील शाखा अभित्यांसह दोघांना 'एसीबी'ने मोहोळ पंचायत समितीत रंगेहाथ पकडले.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पाचशे रुपयांच्या लाचेसाठी (Bribe Case) सोलापूर झेडपी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील शाखा अभित्यांसह दोघांना ‘एसीबी’ने मोहोळ पंचायत समितीत रंगेहाथ पकडले.

    हेमत राजाभाऊ विधाते (वय ५०, शाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, उपविभाग गोहोळ), सिद्रामप्पा मल्लीकार्जुन वैधकर (वय ४३, कनिष्ठ सहायक, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, उपविभाग मोहोळ), गंगाधर हणगल्लु फुलानुवार (वय ३३, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, उपविभाग मोहोळ), जिल्हा परिषद सोलापूर अशी पाचशे रूपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचे वडिल मु.पो हिंगणी (नि) या गावचे सरपंच असून तक्रारदार यांच्या गावामध्ये पाणीटंचाई असल्याने त्यांचे गावांसाठी अनुसूचित जाती व नवबौध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे, २०२१-२०२२ या योजनेअंतर्गत समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, सोलपुर यांच्याकडून पाणीपुरवठा पाईपलाईन करणे या कामास मंजुरी मिळालेली होती.

    या योजनेअंतर्गत मंजुर पाणीपुवठा पाईपलाईन करण्याचे कामाचे अनुषंगाने तक्रारदार हे त्याचे वडिलांचे पतीने पाठपुरावा करण्याकरीता तक्रारदार हे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, उपविभाग मोहोळ येथे पाठपुराव्याकरीता गेले असता यातील आरोपी विधाते यांनी या कामाचे अंदाजपत्रक लवकर तयार करून तांत्रिक मंजुरी मिळवून देण्यास मदत करण्यासाठी ३०० रुपये लाचेची मागणी केली.

    त्यानंतर विधाते यांनी ५०० रुपये लाचेची रक्कम त्यांच्या कार्यालयामध्ये स्वीकारली असता यातील तीनही आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुध्द सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.