महाआवास अभियान ग्रामीण २०२०-२१ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यास तीन पुरस्कार

अमृत महाआवास अभियान सन २०२२-२३ संपुर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे त्या अभियानाचा शुभारंभ व महाआवास अभियान ग्रामीण २०२० २१ मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० 'वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला.

    सोलापूर : अमृत महाआवास अभियान सन २०२२-२३ संपुर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे त्या अभियानाचा शुभारंभ व महाआवास अभियान ग्रामीण २०२० २१ मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० ‘वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. सदर महाआवास अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये सोलापूर जिल्हयास खालीलप्रमाणे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

    १) मंजुर घरकुलांना स्वतःचे घरकुल बांधण्याकरीता शासनाकडून निधी उपलब्ध होतो परंतु सदर निधी हा पुरेसा नसल्याने लाभार्थी नाविण्यपुर्ण घरकुले उभारू शकत नाही त्यामुळे महाआवास अभियान २०२०-२१ यामध्ये लाभार्थ्यांना नाविण्यपुर्ण घरकुले बांधता यावीत यासाठी शासनाने वित्तीय संस्था, स्वंयसेवी संस्था यांच्या माध्यमातुन लाभार्थ्यांना कर्ज स्वरूपात रक्कम मिळवून देण्याबाबतचा उपक्रम संपुर्ण राज्यभरात राबविण्यात आला त्यामध्ये सोलापूर जिल्हयाने मोठया प्रमाणात घरकुल लाभाथ्र्यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्था, स्वयंसहाय्यता समुह इ.च्या माध्यमातून कर्ज मिळवून दिलेले आहे. त्यामुळे या उपक्रमामध्ये सोलापूर जिल्हयास राज्यस्तरावरील तृतीय क्रमांकांचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

    २) कॉर्पोरेट संस्था, स्वंयसेवी संस्था आणि सहकारी संस्था यांचे सहकार्य घेणे. यामध्ये सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यात बांधण्यात आलेल्या डेमो हाऊस ( नमुना घरकुल) यामध्ये घरकुल कसे असावे याकरीता जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी डेमो हाऊस बांधण्यात आले त्याकरीता निधी हा अपुरा पडत असल्याने आय डी बी आय बँक शाखा माळशिरस यांनी त्यांच्या सीएस आर निधीतून र.रू. १,०३०००/- (अक्षरी र.रु. एक लाख तीन हजार) इतका निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचबरोबर जिल्हास्तरीय डेमो हाऊस करीता बैंक ऑफ इंडिया रिजनल विभागाने र.रू. २,६०,०००/- इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. सी एस आर मधून जास्तीत जास्त निधी मिळविण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर राहीला आहे याची दखल घेऊन सोलापूर जिल्हयास राज्यस्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

    माळशिरस तालुक्यात तालुका डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी वेळेवर लाभार्थ्यांना मंजुरी देणे लाभार्थ्यांना हफ्ते वितरीत करणे, करारनामे करून घेणे व घरकुले पुर्ण करून घेणे यामध्ये सोलापूर जिल्हयात माळशिरस तालुका अग्रेसर ठेवून उत्कृष्टरित्या काम केलेले आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यातील तालुका डाटा एन्ट्री ऑपरेटर श्री. सुभाष स्वामी यांना विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.

    घरकुले पुर्ण करणे, नाविण्यपुर्ण घरकुलांचे बांधकाम करीत असताना नाविण्यपुर्ण संकल्पना राबविणे (उदा. पर्यावरणपुरक साहित्याचा वापर करणे), सी एस आर निधी उपलब्ध करणे इ.कामी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व तत्कालीन प्रकल्प संचालक अर्जुन गुंडे व संतोष धोत्रे यांनी सातत्याने मार्गदर्शन व पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्यामुळे सोलापूर जिल्हयास राज्यस्तरावरील तीन पुरस्कार प्राप्त झाले असल्याची माहिती प्रभारी प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी यांनी दिली.