भरघोस नफा देण्याच्या आमिष दाखविले अन्…; सायबर चोरट्यांचा तिघांना गंडा

शेअर मार्केटमधील ट्रेडींगच्या माध्यमातून भरघोस नफा मिळवून देण्याच्या तसेच बीटीसी क्रिप्टो कॉईनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर भरघोस नफा देण्याच्या आमिषाने तिघांना सायबर चोरट्यांनी ३० लाख ४० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

    पुणे : शेअर मार्केटमधील ट्रेडींगच्या माध्यमातून भरघोस नफा मिळवून देण्याच्या तसेच बीटीसी क्रिप्टो कॉईनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर भरघोस नफा देण्याच्या आमिषाने तिघांना सायबर चोरट्यांनी ३० लाख ४० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. बिटकॉईन या आभासी चलनाच्या फसवणूकीनंतर आता बीटीसी क्रिप्टो कॉईनची पहिली फसवणूक समोर आली आहे.

    पहिल्या घटनेत लोणीकंद पोलीस ठाण्यात ५० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून सी स्टॉक मार्केट रिसर्च इन्सिट्युटच्या व्हॉट्सअपग्रुपचे प्रमुख तसेच मोबाईल धारक, वेबपोर्टल व बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

    तक्रारदार वाघोली परिसरात राहण्यास आहेत. तक्रारदारांना शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करायची होती. तेव्हा त्यांना आरोपींनी त्यांच्यामार्फत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना ऑनलाईनरित्या आरोपींनी त्यांच्या बँक खात्यावर ४ लाख ४५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. परंतु, त्यांना कोणताही नफा न देता त्यांची फसवणूक केली.

    दुसऱ्या घटनेत वानवडी पोलीस ठाण्यात ६० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदारांची तब्बल १९ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला आहे. तक्रारीवरून त्यावरून व्हॉट्सग्रुपचे वापरकर्ते व इतरांवर गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदारांना देखील अशाच पद्धतीने शेअर ट्रेंडीगमध्ये गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे आमिष दाखविले. त्यांनाही आरोपींनी एका बँक खात्यावर ऑनलाईन पैसे भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर त्यांना परतावा न देता त्यांची फसवणूक केली.

    तर, तिसऱ्या प्रकरणात टास्कच्या बहाण्याने ६ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांत ३० वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणीला आरोपींनी प्रथम टास्क दिला. त्याबदल्यात नफाही दिला. त्यांचा विश्वास बसल्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यावर ६ लाख ४३ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडत त्यांची फसवणूक केली.