
संभाजी नगरमध्ये एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची दक्कादायक घटना उघ़़डकीस आली आहे. दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
संभाजी नगर: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers Suicide) घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. आधीच पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत असताना आता शेतकरी आत्महत्या होणं ही चिंतेची बाब आहे. संभाजी नगरमध्ये एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची दक्कादायक घटना उघ़़डकीस आली आहे. दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दिनकर बिसनराव बिडवे (वय 48 वर्षे) हतनूर, तालुका कन्नड, कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) पीरबावडा तालुक फुलंब्री आणि वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद साहेबराव मतसागर ( वय 43 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत.
शेतकरी आत्महत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना
पहिल्या घटनेत कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे या शेतकऱ्याने शेतातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (10 सप्टेंबर) च्या सुमारास दुपारी दोनच्या शेताताील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबियांच्या तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र, डॅाक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. दिनकर यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे यांनी सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली. शुक्रवारी राहत्या घरी त्यांनी कुटुंबिाय झोपले असताना विषारी औषध प्राशन केले होते. गेल्या तीन दिवसांपासून घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
पीरबावडा येथील शेतकऱ्याप्रमाणेच, वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद मतसागर यांनीही नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. पावसाने दडी मारल्याने त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊन त्यांना आर्थिक फटका बसला होता. यांच्या शेतातील पिके करपली होती. नापिकीमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवंचनेत असलेल्या अरविंद यांनी शनिवारी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात आल्यावर कुटुंबीयांनी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.