Three gates of Irei Dam opened, alerting citizens

इरई धरणाची (Irei Dam) पाणीपातळी वाढल्याने रविवारी ३१ जुलैला इराई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचे इशारा (Warning alert ) देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आणि आसोलामेंढा मोठा प्रकल्प असून त्या सर्वांमध्ये सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे.

  चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस जवळपास थांबला असला तरी आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये श्रावणसरी बरसत आहे. त्यामुळे धरणाचे पाणी सोडल्याने नद्या-नाले लगतच्या जिल्ह्यांपर्यंत दुथडी भरून वाहत आहेत. वर्धा( Wardha ) येथील लाल नाला धरणातून (Lal Nala Dam) पाणी सोडण्यात आल्याने इरई धरणाची (Irei Dam) पाणीपातळी वाढल्याने रविवारी ३१ जुलैला इराई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचे इशारा (Warning alert ) देण्यात आला आहे. सध्या पुराचा धोका नाही, परंतु, पुन्हा जिल्ह्यात पावसाने जोर धरल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

  वर्धा जिल्ह्यात असलेल्या लाल नाला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच उपनदी इरईच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. रविवारी सुट्टी असल्याने धरण परिसरात नैसर्गिक स्थळाला भेट देण्यासाठी आलेल्या अनेक पर्यटकांना धरणाचे दरवाजे उघडल्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळाले.

  दुपारी धरणाच्या पाण्याची पातळी अचानक २०७ मीटरवर गेल्याने दुपारी १ च्या दरम्यान सीटीपीएस व्यवस्थापनाने १ व ७ क्रमांकाचे दरवाजे ०.२५ मीटरने उघडले, त्यातून ३४.४६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. यानंतर पाण्याची पातळी कमी होत नसल्याचे बघता, गेट क्र. ४ देखील ०.२५ मीटरने उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग ५४.५७ क्युसेकने सुरू झाला.

  पाणी सोडल्याने इरईच्या पुढील परिसरात नदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे नदीकाठावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना आणि रविवारची सुट्टी असल्याने नदीकाठच्या पर्यटनस्थळी मौजमजा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना तसेच नदीकाठच्या वस्तीतील लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  जिल्ह्यातील सर्व जलसाठे तुडूंब

  जुलै महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व जलसाठे तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प (8 medium projects) आणि आसोलामेंढा मोठा प्रकल्प (Asolamendha big project) असून त्या सर्वांमध्ये सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण ८ मध्यम जलसाठे आहेत. त्यात घोडाझरी, नलेश्‍वर, चंदई, चारगाव, लभनसराड, अमलनाला, पकडीगुड्डम, डोंगरगाव जलाशय यांचा समावेश आहे. हे सर्व जलसाठे पूर्णपणे भरले असून, या जलाशयांचे पाणी ओसंडून वाहत आहे. याशिवाय इरई धरणातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला असून जून आणि जुलैमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे जुलै महिन्यातच लोकांना सलग दोन वेळा पुराचा सामना करावा लागला. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.