लक्झरी बस-पिकअप अपघातात तिघांचा मृत्यू

बोरगाव-सापुतारा महामार्गावरील चिखली, तालुका सुरगाणा येथे वणीकडून सापुताऱ्याकडे जाणारी लक्झरी (आरजे २७ २६५८) व बोरगावकडून नाशिककडे जाणारी महिंद्रा पिकअप (एमएच ४१ एयू २१९२) यांच्यात सायंकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान अपघात झाला.

    वणी :  बोरगाव-सापुतारा महामार्गावरील चिखली, तालुका सुरगाणा येथे वणीकडून सापुताऱ्याकडे जाणारी लक्झरी (आरजे २७ २६५८) व बोरगावकडून नाशिककडे जाणारी महिंद्रा पिकअप (एमएच ४१ एयू २१९२) यांच्यात सायंकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान अपघात झाला. यात पिकअपमधील तीन जण कैलास पांडुरंग दळवी (२६, रा. ततानी, तालुका कळवण), पंढरीनाथ मुरलीधर पंचावन्न (सिंगारवाडी, तालुका कळवण), नारायण देवराम पवार (५०, रा.) घागरवाडा, तालुका सुरगाणा) हे तीन जण जागीच ठार झाले.

    भास्कर पांडुरंग राऊत (२७), सुनील पुंडलिक बागूल (३०, रा. बेंदीपाडा), किशोर साबळे (१९), सावळीराम बबन साबळे (४०), यशवंत महादू गायकवाड (४१, सर्व रा. ततानी, तालुका कळवण), यशवंत सोमा राऊत (४५, रा. शिंगारवाडी, तालुका कळवण) या जखमींना बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु सावळीराम साबळे व यशवंत गायकवाड यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली अाहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, संतोष गवळी, पराग गोतरणे अधिक करीत आहेत.