Three lakh worth of valuables were seized in a police raid on a gambling den

दराटी ठाणेदार भरत चापाईतकर (Thanedar Bharat Chapaitkar) यांनी ताफ्यासह छापा मारून जुगार खेळतांना २५ आरोपींना रंगेहाथ पकडले (Caught red-handed) व त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्य व रोख रकमेसह १७ मोबाईल फोन २ मोटार सायकल असा एकंदरीत २ लाख ८९ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले.

    उमरखेड : दराटी पोलीस स्टेशन (Darati Police Station) अंतर्गत शिरफुली (Shirphuli) येथील एका शेतात जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पोलिसांनी ३१ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताचे सुमारास सदर जुगार अड्डयावर छापा मारून जुगार खेळणाऱ्या २५ जणांना ताब्यात घेऊन २ लाख ८९ हजार २० रुपयांचा मुद्देमाल दराटी पोलिसांनी जप्त केला.

    शिरफुली येथील गजानन अवधुत उबाळे यांचे शेतात बंदिस्त टिनाचे कोठ्यात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती  विश्वसनीय सूत्रांकडून  प्राप्त झाली. त्यानंतर दराटी ठाणेदार भरत चापाईतकर (Thanedar Bharat Chapaitkar) यांनी ताफ्यासह छापा मारून जुगार खेळतांना २५ आरोपींना रंगेहाथ पकडले (Caught red-handed) व त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्य व रोख रकमेसह १७ मोबाईल फोन २ मोटार सायकल असा एकंदरीत २ लाख ८९ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले.

    त्यानंतर, त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्या नुसार (As per Maharashtra Gambling Act) कार्यवाही केली. सदर कार्यवाही उपविभागिय पोलीस अधिकारी (Sub Divisional Police Officer )प्रदिप पाडवी यांच्या मार्गदर्शनानुसार दराटी ठाणेदार भरत चापाईतकर, जमादार सय्यद साजिद, धोंडबा खोकले,  पो. ना . संभाजी केंन्द्रे , शिपाई रमन दहीफळे, वामन हेलगीर, रमन चव्हाण यांनी पार पाडली.