आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीमध्ये बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नदीकाठी धुणं धुण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

  कोल्हापूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीमध्ये (Hiranyakeshi River) बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले तिघंही एकाच कुटुंबातील होते. नदीकाठी धुणं धुण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

  कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये हिरण्यकेशी नदीकाठी धुणं धुण्यासाठी कटाळे कुटुंबातील सदस्य गेले होते. त्यावेळी तिघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी नदीकाठी जाऊन धाव घेतली. काहींनी गजरगाव नजीकच्या बंधाऱ्यात तिघांना शोधण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले नाही. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस लगेच दाखल झाले. पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

  मृत्यू झालेल्यांची नावे

  उदय बचाराम कटाळे
  अरुण बचाराम कटाळे
  प्रकाश अरुण कटाळे, असे मृत्यू झालेल्या वक्तींची नावे आहेत.

  करेकुंडी येथील पाझर तलावामध्ये पोहायला गेलेल्या शाळकरी मुलींना वाचवण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त जवानासह दोन मुलींचा मृत्यू झाला होता. ही घटना सोमवारी घडली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळकरी मुली पोहण्यासाठी पाझर तलावामध्ये गेल्या होत्या. मात्र त्यांची दमछाक झाल्यानंतर त्या हळूहळू पाण्यामध्ये बुडू लागल्या. त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त विजय विठोबा शिनोळकर यांचा देखील यामध्ये बुडू मृत्यू झाला. चैतन्या नागोजी गावडे, समृद्धी अजय शिनोळकर यांच्यासह विजय शिनोळकर हे देखील बुडाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटना स्थळी जाऊन तिघांचं मृतदेह बाहेर काढला.