manpada police station

डोंबिवलीमधील (Dombivali) गोळवली परिसरात संजय कुमार, सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम हे चार जण एका खोलीमध्ये एकत्र राहत होते. हे चौघे एमआयडीसीमध्ये काम करत आहे. संजय कुमार आणि सोनू राम यांच्यामध्ये कौटुंबिक वाद झाला. या वादातून वादातून सोनू करण व सुरेंद्र यांनी संजय कुमारला बेदम मारहाण केली.

    डोंबिवली:डोंबिवलीमधील (Dombivali) गोळवली परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन तरुणांनी एका तरुणाचे लिंगच (Penis Cut By Three Men) कापल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) सोनू राम, करण राम ,सुरेंद्र राम तिघांविरोधात पुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले तर पीडित तरुण संजय कुमार याला मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संजय कुमारची प्रकृती चिंताजनक आहे.

    डोंबिवलीमधील गोळवली परिसरात संजय कुमार, सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम हे चार जण एका खोलीमध्ये एकत्र राहत होते. हे चौघे एमआयडीसीमध्ये काम करत आहे. संजय कुमार आणि सोनू राम यांच्यामध्ये कौटुंबिक वाद झाला.  या वादातून वादातून सोनू करण व सुरेंद्र यांनी संजय कुमारला बेदम मारहाण केली.  हे प्रकरण इथेच थांबले नाही तर त्यांनी संजय कुमार यांचे लिंग कापले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संजय कुमार यांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर सोनू राम व करण राम यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वादामागे नक्की काय कारण आहे, याचा मानपाडा पोलीस तपास करत आहेत.

    कल्याण डोंबिवली परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कल्याणमधील (Kalyan) गौरी पाडा परिसरात एका सात वर्षीय मुलाची हत्या (Seven Year old Boy Murder) करण्यात आल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. प्रणव भोसले असे या मुलाचे नाव असून मुलाच्या आईच्या मित्रानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी वॉचमन म्हणून काम करणाऱ्या आरोपी नितीन कांबळे याला ताब्यात घेतले आहे. ही हत्या करण्यामागचे कारण अद्याप उघड झालेले नाही.आर्थिक व्यवहारामुळे मुलाची हत्या करण्यात आली की आणखी काही कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जात मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला.