Three Naxal supporters arrested on the first day of Naxal Martyrs Week

२८ जुलै रोजी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमलापूर गावाजवळील (Kamalapur village) मार्गावर नक्षल बॅनर (Naxal banner) लावताना पोलिसांनी तीन नक्षल समर्थकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी तीन नक्षल समर्थकांना अटक केल्याने जिल्हा पोलीस दलाला मोठे यश मिळाले आहे.

  गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही २८ ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षल्यांद्वारे शहीद सप्ताह (shahid saptah) पाळला जात आहे. या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसक घटना (Violent incidents by Naxalites) घडवून आणण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे नक्षल विरोधी अभियान (Anti Naxal campaign) तीव्र करण्यात आले असून सर्व पोलीस ठाण्यांना अर्लट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान २८ जुलै रोजी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमलापूर गावाजवळील (Kamalapur village) मार्गावर नक्षल बॅनर (Naxal banner) लावताना पोलिसांनी तीन नक्षल समर्थकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी तीन नक्षल समर्थकांना अटक केल्याने जिल्हा पोलीस दलाला मोठे यश मिळाले आहे.

  समर्थकांमध्ये एका डॉक्टरचा समावेश

  अहेरी तालुक्यातील (Aheri Taluka) कमलापूर गावाजवळील मार्गावर शहीद सप्ताह साजरा करण्याच्या हेतुने नक्षली बॅनर लावणाऱ्या तीन नक्षल समर्थकांना पोलिसांनी रात्रीच्या सुमारास अटक केली. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या नक्षल समर्थकांमध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे. डॉ. पवनकुमार उईके असे डॉक्टरचे तर प्रफुल भट व अनिल भट अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपी कमलापूर येथील रहिवासी आहेत. आरोपी ‘आमच्या चळवळीच्या शहीदांना श्रद्धांजली द्या’,(Pay homage to the martyrs of our movement) असा मजकूर लिहिलेला बॅनर लावत होते, अशी माहिती पोलीस विभागाकडून मिळाली आहे.

  सप्ताहाचा पहिला दिवस शांततेत

  नक्षल्यांद्वारे २८ ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह पाळण्यात येतो. या दरम्यान नक्षली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांच्या नावावर स्मारक तयार करुन श्रद्धांजली अर्पण करतात. तसेच, हिंसक घटना घडविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मागील काही वर्षापासून नक्षल्यांना स्थानिक नागरिकांचा विरोध होत असून पोलीस विभागाच्या सतर्कतेने नक्षल्यांचे घातपाताचे मनसुबे उधळले जात आहेत. अशातच नक्षल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडली नसून नक्षल सप्ताहाचा पहिला दिवस शांततेत गेल्याची माहिती आहे.

  कारवाई सुरु आहे – एसपी गोयल

  संबंधित तीन नक्षल समर्थकांना नक्षल बॅनर लावताना अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस विभागाची कारवाई सुरु आहे. नक्षल सप्ताहात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभाग अलर्ट (Police Department Alert) आहे.

  – अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक