पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात टेम्पो कारवर उलटला; चौघांचा मृत्यू!

संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.

    शनिवारी परभणीत ट्रॅक्टर आणि क्रूझरची धडक होऊन भीषण झाला होता. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुणे नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात (Pune- Nashik Highway Accident) झाला आहे. ट्रक आणि टेम्पोच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

    कसा घडला अपघात

    पुणे-नाशिकमहामार्गावरील चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एक आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारच्या वर कोसळल्याने अपघात झाला. या अपघाता कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, महिला आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), आशा सुनील धारणकर (वय 42), सुनील धारणकर (वय 65 वर्ष) व अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्ष, सर्व या.अकोले) अशी मृतांची नावं आहे. तर, अस्मिता अभय विसाळ या महिला बचावली आहे.

     परभणीत ट्रॅक्टर आणि क्रुझरच्या अपघातात तिघांचा मृत्यू

    परभणीच्या परतुर तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथून काही भाविक मानवत तालुक्यातील यशवाडी येथे दर्शनासाठी आले होते . (Parbhani Accident)दर्शन घेऊन गावाकडे परत जात असताना त्यांच्यावर शनिवारी (१६ डिसेंबर) रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यातील वडी पाठीवर काळाने घाला घातला.