Three people from Pulgaon, Hinganghat and Selu in Wardha district drowned in a well

दुसरी घटना हिंगणघाट तालुक्यातील शेगावकुंड येथे घडली. येथील उषा गुलाब वंजारी (वय ४०) या महिलेने कंबरदुखीच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या (suicide) केली आणि आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत (Hinganghat Police) मर्ग नोंद करण्यात आली आहे.

    वर्धा : विहिरीच्या पाण्यात बुडून पुलगाव (Pulgaon), हिंगणघाट (Hinganghat) व सेलू तालुक्यात (Selu Taluka) प्रत्येकी एक असा जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात एकाच विहिरीत बुडून, दुसऱ्या महिलेने आत्महत्या तर तिसऱ्या व्यक्तीने दारूच्या नशेत उडी घेतली असावी असा संशय आहे.

    त्यात पुलगाव येथील क्रष्णमंदिराजवळ असलेल्या विहिरीत पाणी काढण्याकरिता गेलेल्या वासुदेव नारायणराव बोटरे (वय ५८) रा. शेकापूर लोनसावळी पुलगाव यांचा तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू (Death by drowning) झाला. या प्रकरणी पुलगाव पोलिसांत (Pulgaon Police) मर्ग नोंद केला आहे.

    तर, दुसरी घटना हिंगणघाट तालुक्यातील शेगावकुंड येथे घडली. येथील उषा गुलाब वंजारी (वय ४०) या महिलेने कंबरदुखीच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या (suicide) केली आणि आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत (Hinganghat Police) मर्ग नोंद करण्यात आली आहे.

    तसेच तिसरी घटना सेलू तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडली आहे. ब्राम्हणी येथील रहिवासी खुशाल भगवान डाखोळे (वय ६१) हा व्यक्ती दारूच्या नशेत धुंद (Drunk) होता. त्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणात त्याचा तोल गेला की त्याने उडी घेतली हे स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात (Selu Police Station) मर्ग नोंद करण्यात आला आहे.