arrest in betting case

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी (T-20 World Cup) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान या दोन क्रिकेटच्या संघामध्ये अंतिम सामना झाला. या सामन्यासाठी अलिबाग पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये असलेल्या रविकिरण हॉटेलमध्ये काही लोक सट्टा (Betting Case) लावणार असल्याची माहिती पाेलीसांना मिळाली. त्यानुसार दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रविकिरण हॉटेलमध्ये छापा टाकला.

    अलिबाग: टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपच्या (T- 20 World Cup) अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना रायगडच्या (Raigad) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक (Arrest) केली आहे. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अलिबाग पोलीस ठाण्यात (Alibaug Police Station) जुगार कायदा आणि भारतीय तार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालायाने १४ दिवसांसाठी आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. आराेपींनी जामीनीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावरील सुनावणी राखून ठेवण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दयानंद गावडे यांनी नवराष्ट्रशी बाेलताना दिली.

    अँड्रॉ फर्नांडिस, मानिष टुकरेल आणि राजेंद्र भाटिया अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ५३७० रुपये, दाेन मोबाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, इंडियन पोस्टाचे एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले आहे.

    टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान या दोन क्रिकेटच्या संघामध्ये अंतिम सामना झाला. या सामन्यासाठी अलिबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या रविकिरण हॉटेलमध्ये काही लोक सट्टा लावणार असल्याची माहिती पाेलीसांना मिळाली. त्यानुसार दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रविकिरण हॉटेलमध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी दाेन आरोपी हे वर्ल्ड कपसाठी सुरु असलेल्या अंतिम सामन्यावर त्यांच्याकडील मोबाईल वर सट्टा लावून खेळत असल्याचे मिळून आले. तर अन्य एक आराेपीने वेबसाईडचा आयडी आणि पासवर्ड दिला होता. त्यामुळे त्या आराेपीला मुंबईतुन अटक केली आहे.