tanker accident

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर (Mumbai Pune Expressway Accident) प्रोपोलिन गॅस टँकर उलटला आहे. दुपारी १२ च्या आसपास हा अपघात घडला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू (3 Killed In An Accident) झाला आहे.

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Expressway Accident) प्रोपोलिन गॅस टँकर उलटला आहे. दुपारी १२ च्या आसपास घडलेल्या या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू (3 Killed In An Accident) झाला आहे. हा टँकर पुण्याहून मुंबईकडे (Tanker Accident) जात होता. टँकर उलटल्यानंतर काही काळ वाहतूक थांबवण्यात आली आहे.

    खोपोली (Khopoli) एक्झिटजवळ उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर उलटला. यावेळी टँकर दोन गाड्यांवर धडकल्याने भीषण अपघात घडला ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तसेच ३-४ जण जखमी झाले आहेत.
    बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.

    सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. सध्या टँकर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खबरदारी म्हणून खोपोली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. या अपघातात गॅस टँकरचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुणे येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. महामार्गावरील दोन कार या क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आल्या आहेत. खोपोली अग्निशमन विभागाच्या मदतीने टँकर महामार्गावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.