मोठी बातमी! पिरवाडीला मिळाली नवी ओळख; किनाऱ्यावर सापडल्या तीन पाषाणमूर्ती

उरणमधील पिरवाडी किनाऱ्यावर सुट्टीच्या व इतर दिवशी स्थानिक व मोठ्या संख्येने पर्यटक (Tourists) येत असतात. दरम्यान, गुरुवारी काही तरुणांना समुद्राच्या किनाऱ्यावर या तीन मूर्ती दिसून आल्या.

    उरण : उरण (Uran) येथील पर्यटनासाठी (Tourism) प्रसिद्ध असलेल्या पिरवाडी किनाऱ्यावर (Pirwadi Beach) गुरुवारी गणपती, शिव आणि एक देवीची (Found Ganapati, Shiva and a Goddess Idols) अशा तीन पाषाणाच्या मूर्ती आढळल्या आहेत. येथील तरुणांनी समुद्रातून या मूर्ती बाहेर काढून पुन्हा किनाऱ्यावर आणल्या आहेत. त्यामुळे पिरवाडी किनाऱ्यावर आता या देवदेवतांच्या पाषाण मूर्तींचे दर्शन पर्यटकांना घडणार आहे (Tourists will see stone idols of gods and goddesses).

    उरणमधील पिरवाडी किनाऱ्यावर सुट्टीच्या व इतर दिवशी स्थानिक व मोठ्या संख्येने पर्यटक (Tourists) येत असतात. दरम्यान, गुरुवारी काही तरुणांना समुद्राच्या किनाऱ्यावर या तीन मूर्ती दिसून आल्या. त्यानंतर त्यांनी या मूर्ती समुद्रातून बाहेर काढून त्या किनाऱ्यावर आणल्या, मात्र या मूर्ती पूर्वीपासूनच पिरवाडी किनाऱ्यावर होत्या. त्यांचे कोणीतरी समुद्रात विसर्जन केले असावे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. या पाषाण मूर्ती किनाऱ्यावर कशा आल्या, त्या केव्हाच्या व नक्की कोणाच्या आहेत, याचा तपास करण्याची गरज असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.