संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

सार्वजनिक शौचालयात जात असताना एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने अडगळीच्या खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (Attempt to Gang Rape) करण्याचा प्रयत्न तिघांनी केला. 14 वर्षांच्या मुलीने धाडसाने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत हा प्रसंग टाळला. मुंढवा पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे : सार्वजनिक शौचालयात जात असताना एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने अडगळीच्या खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (Attempt to Gang Rape) करण्याचा प्रयत्न तिघांनी केला. 14 वर्षांच्या मुलीने धाडसाने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत हा प्रसंग टाळला. मुंढवा पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

    याप्रकरणी समीर शेख (रा. पंचशीलनगर, घोरपडी), कार्तिक (रा. घोरपडी) आणि मुचा अशी गुन्हा दाखल झालेल्या या आरोपींची नावे आहेत. याबाबत 14 वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे. हा प्रकार घोरपडी येथील पंचशीलनगर येथे सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये शौचाकरीता रात्री साडेबाराच्या सुमारास जात होती.

    त्यादरम्यान रेल्वे पटरीच्यामध्ये उभी राहून ती मोबाईल बघत होती. त्यावेळी तिघे जण आले. त्यांनी तिचा मोबाईल जबरदस्तीने घेतला. तिने मोबाईल परत मागितला. तेव्हा त्यांनी शारीरीक संबंध करायचे आहेत, असे म्हणून तिला मारहाण करुन जवळच्या अडगळीच्या खोलीत नेले. तेथे तिच्या अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्याला विरोध करुन त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतले.