संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

चंदगड तालुक्यातील भात, नाचणी , भुईमूग, कापणी-मळणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भात पिके नाचनी फुलाेऱ्यात येताना पावसाची नितांत गरज होती. त्यावेळी पावसाने दडी मारली आणि आता गेले आठ दिवस दररोज हजरी लावली आहे.

    चंदगड : चंदगड तालुक्यातील भात, नाचणी , भुईमूग, कापणी-मळणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भात पिके नाचनी फुलाेऱ्यात येताना पावसाची नितांत गरज होती. त्यावेळी पावसाने दडी मारली आणि आता गेले आठ दिवस दररोज हजरी लावली आहे. त्यामुळे हातातोडांशी आलेली भात, नाचणी पिके जमिनीवर पडली असून मळणी करताना शेतकरी हैराण झाला आहे. रोजच पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. आंदोलनामुळे ऊस तोडणीची कामे उशिरा सुरू झाली आहेत. पावसामुळे वाहने शेतात जात नसल्याने ऊस तोडणी हंगाम लांबणीवर पडत आहे. उसाचा दर जाहीर केल्याशिवाय उसाची एक कांडी सुध्दा तोडायची नाही म्हणून शेतकरी संघटनेने आंदोलन केले. त्यामुळे आठ-पंधरा दिवसाचा कालावधी निघून गेला. उसाची तोडणे रखडली. आता पावसामुळे उसाच्या फडात उसाच्या फडात ट्रॅक्टर, ट्रॅक आदी वाहने जात नाहीत. त्यामुळे ऊस तोडणी रेंगाळली आहे.

    शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न
    पिके फुलाेऱ्यात येत असताना पाऊस पडला असता तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असती. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता भात, नाचनी पिकाबरोबर पिंजर व करडाचे गवत भिजून काळे पडत अाहे. ते जनावराना खाण्यास अयोग्य आहे. या पावसामुळे मात्र चंदगड तालुक्यातील भात, नाचना आदी पिकाबरोबर जनावरांच्या वैरणीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर भेडसावत आहे.