गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक; इंदापुरात मराठा साखळी उपोषणाला भेट देताना मराठा आंदोलक आक्रमक

इंदापुरात मराठा समाजाच्या साखळी उपोषणस्थळी गोपीचंद पडळकर हे भेट देण्यासाठी जात होते. त्यावेळी वाटेत त्यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली. मराठा साखळी उपोषणाच्या थोड्या अंतरावर ओबीसी एल्गार मेळावा सुरू होता. त्यात गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले होते.

    बारामती : इंदापुरात गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक करण्यात आली आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी मराठा समाजाविरोधात भाषण केल्यामुळे इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. गोपीचंद पडळकर यंच्यावर गुन्हा नोंद करण्याची मराठा आंदोलकांनी यावेळी मागणी करण्यात आली. ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर गोपीचंद पडळकर हे मराठा साखळी उपोषणाजवळ आले. त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. ज्या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावा होता त्या ठिकाणावर काही फुटावरती मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे