संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

ताडकळस व परिसरातील लिमला, फुलकळस खंडाळा, माखणी, कळगाव, धानोरा काळे, बानेगाव, महागाव मुंबर, कळगाववाडी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

    ताडकळस : ताडकळस व परिसरातील लिमला, फुलकळस खंडाळा, माखणी, कळगाव, धानोरा काळे, बानेगाव, महागाव मुंबर, कळगाववाडी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात मोठ्या गारांचाही जवळपास २० मिनिटे वर्षाव झाल्यामुळे शेतकरी हैराण झाला.

    अवकाळी पाऊस व गारांच्या मारामुळे शेतातील कापून टाकलेला कडबा चारा, अंबा फळबाग, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच गारांचा मोठा खच साचला होता. तर परिसरातील गाव शिवारातही वादळी वाऱ्यासह गारा पडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी हैराण होत आहे.

    परिसरातही चक्रीवादळासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन मदत देण्याची मागणी केली जात आहे.