गुरुवार ठरला ‘अपघात वार’; रायगडनंतर कणकवलीतही भीषण अपघात, आरामबस उलटून ४ जणांचा मृत्यू तर २३ जण जखमी

गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला, ही बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती. कणकवलीतही भीषण अपघात झाला आहे. कणकवलीत आरामबस उलटून 4 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले आहेत.

  कणकवली- आजचा गुरुवार ‘अपघात वार’ ठरला आहे. नवीन वर्षात अपघाताच्या (Accident) घटना काही कमी होताना नाव घेत नाहीत, मागील आठवड्यात नाशिक (Nashik) येथे मोठी अपघाताची घटना ताजी असतानाच, आज पहाटे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (mumbai goa national highway) भीषण अपघात झाला आहे. रायगडमध्ये झालेल्या या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू (Nine dead) झाला आहे. या अपघातानंतर कोकणात देखील अपघात घडला आहे. कणकवलीतही भीषण अपघात झाला आहे. कणकवलीत आरामबस उलटून 4 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले आहेत. त्यामुळं आजचा गुरुवार गुरुवार ‘अपघात वार’ ठरला आहे.

  अपघातात चार ठार…

  दरम्यान, आज  पहाटे 4 वाजता हा अपघात झाला असून या अपघातात 4 ठार तर 23 जण जखमी असल्याची माहिती मिळतेय. गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला, ही बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती. कणकवलीतही भीषण अपघात झाला आहे. कणकवलीत आरामबस उलटून 4 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झालाय.

  जखमींवर उपचार सुरु

  या बस 36 प्रवासी होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत. तसेच जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे साताऱ्यात देखील अपघात घडला आहे.

  साताऱ्यात ट्रॅक्टर पलट

  राज्यात आज अपघातवार ठरला आहे, दुसरीकडे पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी येथे दोन ट्रॅक्टर पलटल्यानं अपघात झाला आहे. ऊस गाळपासाठी राजगड कारखान्यात घेऊन जात असताना धांगवडी गावजावळील चढावर दोन ट्रॅक्टर उसानी भरलेली ट्रॉली ओढत असताना ते पलटल्यानं हा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, मात्र दोन्हीही ट्रॅक्टरच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.