Tiger attack terrorized citizens of Wadala (Shaheed) area, bull died in the attack

एक महिन्यापासून सतत अतिवृष्टी ( Heavy Rain ) सुरू असल्याने शेतातील डवरणी व इतर कामे ठप्प आहेत. त्यामुळे दररोजच्या ठरलेल्या वेळेनुसार संदीप पोटे हे शेतात बैल चारत होते. दुपारी एक ते दोनच्या दरम्यान बैल चरत असताना त्यांच्या बैलावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून बैलाच्या डाव्या पायाचे वाघाने लचके तोडले.

    साहूर : नजीकच्या वडाळा (Wadala) (शहीद) येथे दुपारच्या सुमारास शेतकरी संदीप पोटे यांच्या बैलावर वाघाने हल्ला (Bull attacked by tiger) करून बैलाला गंभीर जखमी केले. त्यामुळे, बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    प्राप्त माहितीनुसार, वडाळा शहीद येथील गरीब शेतकरी संदीप पोटे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. एक महिन्यापासून सतत अतिवृष्टी ( Heavy Rain ) सुरू असल्याने शेतातील डवरणी व इतर कामे ठप्प आहेत. त्यामुळे दररोजच्या ठरलेल्या वेळेनुसार संदीप पोटे हे शेतात बैल चारत होते. दुपारी एक ते दोनच्या दरम्यान बैल चरत असताना त्यांच्या बैलावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून बैलाच्या डाव्या पायाचे वाघाने लचके तोडले.

    यात शेतकऱ्यांचे ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याबाबत वनविभागाला (Forest Department) कळविले असता क्षेत्र सहाय्यक लालचंद धनविजय (Assistant Lalchand Dhanvijay) व वनरक्षक राधिका भोसले (Forest Guard Radhika Bhosale ) यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. शेतकऱ्याला मदत देण्याचे आश्वासन दिले. ऐन कामाच्या हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने शेतक-यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. वाघाने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.