tiger became a deadlock! Tiger tour on Nagpur - Gadchiroli highway

ब्रह्मपुरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत सायगाटा जंगल परिसर हा वाघाचा भ्रमंती मार्ग आहे. वाघाला महामार्ग ओलांडताना दुर्घटना होवू नये, यासाठी या परिसरात वनविभागाने पथकाचा बंदोबस्त लावला आहे. अलीकडे ब्रह्मपुरी तालुक्यातील सायगाटा - अड्याळ जंगल परिसर आला की, या मार्गावर वाहनांचा वेग मंदावतो. कुणाला वाघ बघयचा असतो, तर कुणी वाघ रस्ता तर ओलांडत नाही ना, या भितीने थबकतो. हे आता नेहमीचे झाले आहे.

    ब्रह्मपुरी : नागभीड – गडचिरोली (Nagbhid – Gadchiroli) या महामार्गावर (Highway) सायगाटा (Saigata) येथे दोन ते तीन दिवसांपासून वाघ रस्ताच्या (Tiger On Road) बाजूला ठाण मांडून बसला होता. यावेळी वन विभागाच्या कर्मचा-यांनी तेथे पोहचून दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून वाघाला रस्ता मोकळा करून दिला. त्यानंतर वाघाने ऐटीत रस्ता ओलांडण्याचे दृश्य अनेकांनी बघितले. त्यामुळे सध्या या ठिकाणी वाघोबा गतिरोधक बनल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

    नागपूर – गडचिरोली महामार्ग आता चांगला झाल्याने या मार्गावर वाहने सुसाट धावतात. मात्र, अलीकडे ब्रह्मपुरी तालुक्यातील सायगाटा – अड्याळ जंगल परिसर आला की, या मार्गावर वाहनांचा वेग मंदावतो. कुणाला वाघ बघयचा असतो, तर कुणी वाघ रस्ता तर ओलांडत नाही ना, या भितीने थबकतो. हे आता नेहमीचे झाले आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सायगाटा व अड्याळ या दोन्ही बाजूच्या संरक्षित जंगलाचा व वन्यप्राणी आवागमनाची बाजू संबंधित विभागाने लक्षात घेण्याची गरज आहे.

    वन्यप्राण्यांना ये-जा करणे सुलभ व्हावे, याकरीता किमान १ किमी अंतरावर अंडरपास असे ठिकाणी हवे होते. परंतु, सातत्याने या मार्गावर वाघ रस्ता ओलांडताना नागरिकांना दिसत आहे. त्यामुळे अनेक लोक वाहने थांबवून वाघाचे दृश्य कॅमेरात कैद (Scene caught on camera) करत आहे. या परिसरात वाघाचा वावर असल्याने लोकांनी सदर परिसरात येवून वन्यप्राण्यांना अडथळा निर्माण करू नये व परिसरात जाण्याचे टाळावे. वन्यप्राणी यांना रोड क्रॉस (Road Cross) करण्यासाठी अंडरपास तयार करण्याकरीता नॅशनल हायवे ऑथोरिटी (National Highways Authority) कडून कार्यवाही सुरू आहे. लवकरात लवकर अंडरपास तयार करण्याचे काम सुरू होणे अपेक्षित असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

    वाहन विनाकरण थांबविल्यास होणार कारवाई

    ब्रह्मपुरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र (North Forest Zone) अंतर्गत सायगाटा जंगल परिसर हा वाघाचा भ्रमंती मार्ग आहे. वाघाला महामार्ग ओलांडताना दुर्घटना होवू नये, यासाठी या परिसरात वनविभागाने पथकाचा बंदोबस्त लावला आहे. वनविभाग वाघाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. सायगाटा जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने सदर परिसरात कोणतेही वाहन विनाकारण थांबवून वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९७२ अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले आहे.