संतापलेल्या अस्वलीपुढे नमला वाघाचा बछडा, जंगलात धूम ठोकली, व्हिडिओ वायरल!

सध्या या व्हायरल व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. एरवी जंगलचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाघालाही संतापलेल्या अस्वलीपुढे माघार घ्यावी लागल्याने पर्यटंकाचं चांगलचं मनोरंजन झालयं.

    चंद्रपूर : जिल्ह्यातील पर्यटकांना एक पाहिली अनोखी घटना पाहायला मिळाली. वाघाच्या बछड्याने अस्वलीचा रस्ता रोखल्यावर व्हिडिओ सध्या वायरल झालाय. यानंतर बछड्याच्या मागे अस्वल धावले आणि अस्वलीचा रुद्रावतार पाहून वाघ बछड्याने जंगलात धूम ठोकली. एरवी जंगलचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाघालाही संतापलेल्या अस्वलीपुढे माघार घ्यावी लागली. वन्यजीव विश्वातील अशा गमती-जमती पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव श्रीमंतीचे दर्शन घडवितात.

    सध्या या व्हायरल व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. एरवी जंगलचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाघालाही संतापलेल्या अस्वलीपुढे माघार घ्यावी लागल्याने पर्यटंकाचं चांगलचं मनोरंजन झालयं.