“वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा…” बाळासाहेब, मोदी आणि एकनाथ शिंदेंचा फोटो होतोय व्हायरल; नेमकं काय आहे ट्विटमध्ये? ‘या’ नेत्यानी…

गिरगावतील पोस्टरवर मोदी यांनी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर हातात हात घेऊन नतमस्त झाले आहेत, अशा प्रकारेच बॅनर काल मुंबईत झळकले होते. त्यानंतर काल लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ शिंदेंनी मोदीच्या हातात हात घेऊन नतमस्त झाल्याचा फोटो समोर आला आहे.

    मुंबई- राज्यातील सत्त्तांरानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे काल मुंबईत येणार असल्यामुळं मुंबईत शिंदे-फडणवीसांकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. काल मोदींच्या हस्ते मुंबईत विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. तसेच आगामी काळात विविध विकासकामे मुंबईत दिसतील, असं मोदींनी म्हटलं. दरम्यान, काल मुंबईत मोदी येणार म्हटल्यावर, शिंदे-फडणवीसांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली होती. तसेच काल गिरगावात आणखी एक पोस्टर सर्वाचं लक्ष वेधून घेत होता.

    काय आहे फोटोत?

    दरम्यान, गिरगावतील पोस्टरवर मोदी यांनी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर हातात हात घेऊन नतमस्त झाले आहेत, अशा प्रकारेच बॅनर काल मुंबईत झळकले होते. त्यानंतर काल लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ शिंदेंनी मोदीच्या हातात हात घेऊन नतमस्त झाल्याचा फोटो समोर आला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    काय म्हटलंय ट्विटमध्ये?

    ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत, भाजपाला डिवचले आहे. तसेच शिंदे गटाचा स्वाभिमान कुठे आहे? असा सवाल या ट्विटमधून उपस्थित केला आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विट करत दोन फोटो दाखवलेत, एका फोटोत मोदी बाळासाहेबांसमोर नतमस्तक होतायेत, आणि दुसऱ्या फोटोत एकनाथ शिंदे हे मोदीसमोर नतमस्तक होतायेत असे दोन फोटो ट्विटमध्ये शेअर केले असून, ”वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा….” असं कॅप्शन लिहिले आहे. दरम्यान यावर शिंदे गट तसेच भाजपाकडून प्रतिउत्तर येण्याची शक्यता आहे.