८ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यास मोर्चा काढणार, आमदार सतेज पाटील यांचा इशारा

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार उद्यास येऊन आता एक महिनाच्यावर कालावधी उलटून गेला आहे, तरी सुद्धाअद्यापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Ministers) झालेला नाही. त्यामुळं विरोधक यावरुन टिका करत आहेत. दरम्यान, यावरुनच आता काँग्रेस नेते व माजी मंत्री सतेज पाटील (Satej patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.

    मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) आलं आहे, हे सरकार येण्यास कारण म्हणजे शिवसेनेतील ३९ आमदारांनी (Shivsena MLA) केलेले बंड. शिवसेनेतील ३९ आमदारांनी बंड करत थेट महाविकास आघाडी सरकारला (MVA) आव्हान दिले. त्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोंडी घडत शेवटी शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) अस्तित्वात आले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणूनन देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी शपथ घेतली. राज्यात शिंदे फडणवीस सरकार उद्यास येऊन आता एक महिनाच्यावर कालावधी उलटून गेला आहे, तरी सुद्धा अद्यापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Ministers) झालेला नाही. त्यामुळं विरोधक यावरुन टिका करत आहेत. दरम्यान, यावरुनच आता काँग्रेस नेते व माजी मंत्री सतेज पाटील (Satej patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.

    दरम्यान, येत्या 8 ऑगस्टपर्यंत (8 August) मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet ministers) न झाल्यास आम्हाला मोर्चा काढावा लागणार, असा इशारा काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री सतेज पाटील यांनी शिंदे-भाजप सरकारला दिला आहे. आज सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलावर आहे. तर कोणाला किती मंत्रीपद द्याची यावरुन एकमत नसले तरी, हा दोघांचा अंतर्गत विषय आहे, पण जनतेचे काय म्हणून नुकसान करता असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं येत्या 8 ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यास आम्हाला मोर्चा काढावा लागणार, असा इशारा काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री सतेज पाटील यांनी शिंदे-भाजप सरकारला दिला आहे.