पाथरवट व्यावयायिकांवर उपासमारीची वेळ! आधुनिक युगात पाटा-वरवंटा कायमचा गायब  

पाट्याला.... वरवंट्याला.....पिठाच्या जात्याला ठोकं घालून घ्या.... अशी हाक पाथरवट व्यावसायिक खेडेगावातून तसेच गल्लीतून मारत आहेत. परंतु आता या आधुनिक युगात स्वयंपाक घरात विजेवर चालणारे मिक्सर आले.

  चंदगड : पाट्याला…. वरवंट्याला…..पिठाच्या जात्याला ठोकं घालून घ्या…. अशी हाक पाथरवट व्यावसायिक खेडेगावातून तसेच गल्लीतून मारत आहेत. परंतु आता या आधुनिक युगात स्वयंपाक घरात विजेवर चालणारे मिक्सर आले. कुटण्यासाठी लागणारा खलबत्ता, वाटण्यासाठी लागणारा पाटा – वरवंटा कायमचाच गायब झाला आहे. त्यामुळे पाथरवट व्यावसायिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

  पाटा-वरंवटा, खलबत्ता हे स्वयंपाकासाठी बाह्य साधन म्हणून गेल्या पन्नास- साठ वर्षापूर्वी पासून वापरले जात असे.  पाटा-वरवंटा तयार करण्यासाठी लागणारा दगड काळा आणि कठीण असायचा.  तो दगड माळरानात किंवा डोंगर दरीत जाऊन शोधून जमिनीतून बाहेर काढून आणायचे. त्याला आकार देवून चौकोनी, पंचकोनी व एक दंड गोलाकार आकाराचा दगडी भाग तयार करायचे. पाटा वजनदार आणि साधारण ४ ते ५ इंच जाडीचा नक्षीदार बनवायचे. पाट्याच्या रुंदीच्या प्रमाणात वरवंट्याला गोलाकार आकार देवून दोनही हातात पकडता येईल या अंदाजाने बनवून खेडेगावात विक्रीसाठी आणायचे.

  पाटा-वरवंटा पदार्थांची चव झकास  
  पाटा-वरवंटा, घ्या… जातं घ्या…. ठोकं घालून घ्या….अशी हाक मारत आपला व्यवसाय करायचे. त्या काळात महिला भात, नाचना हे धान्य किंवा पैशाच्या स्वरूपात रक्कम देऊन खरेदी व ठोकं घालून घेत असत. त्या पाट्यावर मसाला, चटणी, पोळी पीट, खर्डा,(ठेचा) आदी जेवणातील चवदार खमंग पदार्थ तयार केले जात होते. त्या काळात विज असो किंवा नसो त्या पाट्यावर महिला मसाला पदार्थ बारीक करायच्या. वंरवटा दोन्ही हाताने पकडून पाट्यावर वाटायच्या त्यामुळे महिलांच्या दोन्ही हाताना आणि दोन्ही भुजाना एक प्रकारे व्यायाम होत असे. तसेच चवदार खंमग पदार्थ हि तयार व्हायचा. परंतु आता बिन त्रासाचे लवकर काम होते. म्हणून आता पाटा – वरवंटा, खलबत्ता अडगळीच्या ठिकाणी पडला असून तो गायब झाला आहे.

  या वस्तू म्हणजे घरची लक्ष्मी
  घरात झाडू, पाटा-वरवंटा, मुसाळ, व्हहिन आदी वस्तू म्हणजे घरची लक्ष्मी. म्हणून त्या सर्व वस्तू आपल्या शेतक-यांच्या घरी पाहिजेतच असे त्या व्यावसायिक मंडळींच्या मुखातून आपसूकच शब्द बाहेर येतात. परंतु शहरी भागात या वस्तु आता एख्ााद्या संग्रालयातच पहावयास मिळत आहेत.